LARC & MOVS Sports Day

प्रिझम फौंडेशन संचालित

लार्क व माधवी ओगले व्यावसायिक शाळा (एम. ओ. व्हि. एस.)

क्रीडा दिन

शुकवार दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी एम. ओ. व्हि. एस. व लार्क शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा दिन संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामायनी शाळेचे प्राध्यापक श्री. दैवत लिमण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रांजली कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्याची ओळख स्नेहल वाळिंबे यांनी करून दिली. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांचे मेडल्स देऊन कौतुक करण्यात आले. पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात क्रीडा दिन साजरा करण्यात आला.